एका पिशवीत आठ लाल व काही निळे चेंडू आहेत. एक चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला, तर लाल चेंडू आणि निळा चेंडू यांच्या संभाव्यतेचे गुणोत्तर 2 : 5 आहे, तर निळ्या चेंडूची संभाव्यता काढा.
Solution
समजा, निळ्या चेंडूची संख्या x मानू.
लाल चेंडूची संख्या = 8
∴ एकूण चेंडूची संख्या = (x + 8)
P(निळा चेंडू काढणे) = `x/(x + 8)`
P(लाल चेंडू काढणे) = `8/(x + 8)`
दिलेल्या अटीनुसार,
लाल चेंडू आणि निळा चेंडू यांच्या संभाव्यतेचे गुणोत्तर 2 : 5 आहे.
∴ `("P"(लाल चेंडू काढणे))/("P"(निळा चेंडू काढणे)) = 2/5`
∴ `(8/(x + 8))/(x/(x + 8)) = 2/5`
∴ `8/(x + 8) = 2/5 xx x/(x + 8)`
20(x + 8) = x(x + 8)
∴ 20x + 160 = x2 + 8x
∴ x2 + 8x – 20x – 160 = 0
∴ x2 – 12x – 160 = 0
∴ x2 – 20x +8x – 160 = 0
∴ x(x – 20) + 8(x – 20) = 0
∴ (x – 20)(x + 8) = 0
∴ x – 20 = 0 किंवा x + 8 = 0
∴ x = 20 किंवा x = –8
परंतु, चेंडूची संख्या ऋण असू शकत नाही.
∴ x = 20
∴ P(निळा चेंडू काढणे) = `x/(x + 8) = 20/(20 + 8) = 20/28 = 5/7`
∴ पिशवीतून निळा चेंडू काढण्याची संभाव्यता `5/7` आहे.