‘अ’ या धातूचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 1 आहे आणि ‘ब’ या धातूचे इलेक्ट्रॉन संरुपण 2, 8, 8, 2 आहे. या दोन धातूंपैकी कोणता धातू हा अधिक अभिक्रियाशील आहे. त्यांची विरल HCl आम्लासोबत होणारी अभिक्रिया लिहा.
Solution
जेवढे बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन कमी, तेवढी धातूची क्रियाशीलता अधिक असते. अ या धातूच्या बाह्यतम कक्षेत एक इलेक्ट्रॉन असतो, तर ब या धातूच्या बाह्यतम कक्षेत दोन इलेक्ट्रॉन असतात. म्हणून अ हा धातू ब या धातूपेक्षा अधिक क्रियाशील आहे.
धातू अ हा सोडिअम आहे, तर धातू ब हा कॅल्शिअम आहे. ब या धातूची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाशी होणारी अभिक्रिया पुढीलप्रमाणे असेल. यात हायड्रोजन वायू मुक्त होतो.
\[\ce{\underset{\text{कॅल्शिअम}}{Ca} + \underset{\text{विरल}}{2HCl} -> \underset{\text{कॅल्शिअम क्लोराइड}}{CaCl2} + \underset{\text{हायड्रोजन}}{H2↑}}\]
\[\ce{\underset{\text{सोडिअम}}{2Na} + {2HCl} -> \underset{\text{सोडिअम क्लोराइड}}{2NaCl_{(aq)}} + \underset{\text{हायड्रोजन}}{H2_{(g)}}}\]