खालील वाक्यातील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व समान गुण ओळखा.
आईचे प्रेम सागरासारखे असते.
आमच्या गावचे सरपंच कर्णासारखे दानशूर आहेत.
राधाचा आवाज कोकिळेसारखा मधुर आहे.
खालील वाक्यांत अधोरेखित शब्दाऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा.
वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे शिकवणे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे.
आपल्या शाळेचे नाव वाईट होऊ नये, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने काळजी घ्यायला हवी.
उत्तम वादनाने लेखकाचे शिरीषबाबतचे मत चांगले झाले.
खालील वाक्यातील उपमेय, उपमान, साधर्म्यवाचक शब्द, साधर्म्य ओळखा.
आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे!
त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे.